loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत धामणसे ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी (वार्ताहर) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत धामणसे ग्रामपंचायत मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी महा स्वच्छता रॅली श्रीदेव रत्नेश्वर मंदिर तें रेवाळे वाडी पर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये सरपंच अमर रहाटे, उपसरपंच ऋतुजा कुलकर्णी ग्रामपंचायत अधिकारी देविदास इंगळे, सदस्य वैष्णवी धनावडे, समीर सांबरे, अनघा जाधव, संजय गोणबरे शिक्षक गायकवाड, महेंद्र रसाळ, ढापरे, कांबळे, जाधव, पाटील, आरोग्य सहाय्यक निवेडकर, ग्रामपंचायत महसूल अधिकारी सिद्धी शिवलकर, आरोग्य सेवक, कृषी सहाय्य्क मोहिरे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ विद्यार्थीआणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा सुधरूढा बालक स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान बाबत जनजागृती साठी वार्डसभा तसेच वॉल पेंटिंग करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातून चार बंधारे बांधण्यात आली. बचत गटाच्या उत्पादीत मालाचे दत्त जयंती उत्सवात विक्री प्रदर्शन भरविण्यात आले. अभियान काळात करांची वसुली 98% करण्यात आली. लोकसहभाग म्हणून ग्रामस्थांनी 210000/- इतकी लोक वर्गणी देऊन सहकार्य केले. गावा मध्ये ग्रामस्थांमार्फत नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सदर अभियानात लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg