loader
Breaking News
Breaking News
Foto

संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

मालवण (प्रतिनिधी) - चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित कै. संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराचा शुभारंभ चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपाध्यक्ष विवेक परब, सल्लागार भाई तावडे, संतोष अपराज, तसेच निशांत पारकर, रक्तपेढीच्या डॉ भारती ठोंबरे, निता आरोलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कार्यवाह सिध्देश गोलतकर म्हणाले, चिंदर सेवा संघ गेली सहा वर्ष रक्तदान शिबीर घेत असून अनेक व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी या रक्तदान शिबिरात घेण्यात आलेल्या रक्ताचा उपयोग झाला आहे असे सांगितले तर कार्यवाह सिध्देश गोलतकर म्हणाले, तर पी. एस. आय विलास टेंबुलकर, कॉन्स्टेबल अमित हळदणकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य दिपक सुर्वे, संदिप परब, नंदिनी पावसकर, सुनंदा अपराज, गुरु जावकर, अश्विनी पाताडे, संजय हडपी, डॉ. विवेक घाडगे, आत्माराम नाटेकर, विलास परब, गुरुनाथ नाटेकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, मंगेश नाटेकर, अरविंद घाडी, बाबरी गांवकर आदींनी रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन, समारोप सिद्धेश गोलतकर यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रक्तदान शिबिरात भूषण नारायण पाताडे, दिपक रामचंद्र तावडे, गोविंद धोंडू गांवकर, याज्ञिक दिनेश पाताडे, अनिल पांडुरंग चिंदरकर, प्रथमेश शंकर अपराज, आशिष चंद्रशेखर कोरगांवकर, तुषार विष्णू बेहेरे, पराग राजेंद्र शिरसाट, वरद संजय जोशी, विजय धाकू घाडी, ओमकार कृष्णा आचरेकर, तेजल सुरेंद्र मुळे, दत्ताराम मनोज सावंत, शंकर सदानंद पालकर, दत्तात्रय महादेव जाधव, सागर मनोहर नाटेकर, विश्वनाथ लोकेगांवकर, प्रसाद प्रताप पडवळ, सागर सत्यवान चव्हाण, निलेश विजय रेवडेकर, ललित चंद्रकांत घाडीगांवकर, दिलीप सहदेव गोसावी, श्रेयस दिपक सावंत, अमर मगर, भूषण अरविंद दत्तदास, नारायण संजय पाताडे, संतोष शामराव गोसावी, रुपेश केशव पडवळ, विजय दशरथ पवार, गिरीश पवार, शिशिर चंद्रशेखर पालकर, ओंकार तावडे, विनम्र सुहास चिंदरकर, सागर घाडी या चौतीस रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्यदान केले. तर दिपक अनंत मांडवकर, दिनेश अनंत आर्वेकर, अभय आनंद पाडावे, पूनम संदिप पारकर, सानिका सुरेंद्र मुळे, रोहन शंकर गांवकर, रामचंद्र विठ्ठल परब, जगन्नाथ घाडी, ओमकार वळंजू, संपदा अपराज, संतोष पडवळ यांनी सहभाग दर्शवला. रक्तदात्यांना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व संतोष गांवकर यांच्या वतीने देण्यात आलेली भेट वस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

३४ दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg