loader
Breaking News
Breaking News
Foto

संस्कृत भारतीतर्फे आयोजित श्रीमद्भगवद्गीता पारायणाला अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी : आधुनिक काळामध्ये जीपीएस ज्याप्रमाणे माणसाला एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवतो, त्याप्रमाणेच श्रीमद्भगवद्गीता ही माणसाला अनेक मार्ग दाखवते, आपण योग्य तो मार्ग निवडावा. तसेच गीता सर्वांचे समुपदेशन करते, असे प्रतिपादन डॉ. सुचेता परांजपे यांनी केले. संस्कृत भारती रत्नागिरीच्या वतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित गीता पारायण करण्यात आले. त्यानंतर दैनंदिन जीवनातील गीता या विषयावर डॉ. परांजपे यांनी विस्तृत विवेचन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माधवराव मुळ्ये भवन येथे गीताजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी सुमारे २०० गीताप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतमातेच्या व श्रीकृष्णाच्या प्रतिमापूजनाने आणि गीता पूजनाने झाला. संस्कृतभारतीचे विभाग संयोजक श्री मनोहर काजरेकर आणि ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका व गीताव्रती सौ वंदना घैसास यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर संपूर्ण १८ अध्यायांचे पारायण सौ. योजना घाणेकर, सौ. किशोरी मोघे, सौ. अमृता आपटे आणि चिन्मयी सरपोतदार यांच्या नेतृत्वाखाली झाले. श्री. किशोर पावसकर आणि श्री. मोहन भिडे यांच्या हस्ते झालेल्या गीता आरतीने पारायणाची सांगता झाली. व्याख्यान कार्यक्रमात गीताव्रतींचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण गीता पाठ करून शृंगेरीच्या श्री शंकराचार्यांसमोर सादर करून आलेल्या सौ. अपर्णा जोशी, सौ. किशोरी मोघे, सौ. मीरा नाटेकर आणि सौ. अश्विनी जोशी यांचा सत्कार डॉ. सुचेता परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनकर मराठे यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील संवाद असलेली गीता युद्धभूमीवर सांगितली गेली. त्यावेळी तिथे कोलाहल होता. बाहेर व मनातले द्वंद्व दूर करायला सद्सद्विवेक कळण्यासाठी गीता उपयोगी आहे. आशिष आठवले यांनी संस्कृत भारतीची माहिती सांगताना संस्कृतभारती करत असलेल्या गीतेसंदर्भातील उपक्रमांची माहिती सांगितली. गीताजयंती निमित्त दररोज गीतेतील दोन श्लोक घरातील सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणावेत आणि पुढील वर्षी गीतापारायणात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg