loader
Breaking News
Breaking News
Foto

सांजसाई मापुसकर एम टेक गोल्डमेडलने सन्मानित

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - साउथ इंडियन एज्यु. सोसा.नवी मुंबई येथे पदवीदान दीक्षांत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कळंबस्ते ता.संगमेश्वर येथील संजय मापुस्कर यांचे चिरंजीव सांजसाई यांनी एम टेक फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये प्रचंड यश मिळाल्याने त्यांचा गोल मेडल/तिन सिल्वर मेडल सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे संजय मापुस्कर हे एक रिक्षा व्यवसायीक असून त्यांना दोन अपत्य, पैकी दोन्ही मुलांनाही त्यांनी मुलांनाही त्यांनी सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्था बी टेक पर्यंत शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबई येथे साउथ इंडियन शिक्षण सोसायटी येथे एम टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले.

टाइम्स स्पेशल

संजय मापुस्कर यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून त्याने मुलांना शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल केले. संजय मापुस्कर यांच्या कष्टाची दखल दोन्ही मुलांनी घेतली आणि त्यांना नुकताच नवी मुंबई येथे पदवीदान प्रदान कार्यक्रमात गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात संजय मापुस्कर उभयतांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg