loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळ सर जे जे रुग्णालय यांचे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन

मुंबई - रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळाचे या वर्षीचे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी साजरे होत आहे. रत्नागिरी जिल्हा लोककलेवर आधारीत गर्जतो महाराष्ट्र शिवबाचा प्रस्तुत नितीन रसाळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील लोककला लोप पावत चाललेला आहेत. त्या जतन करून लोककलेच्या माध्यमातून कोकणातील संस्कृती जोपासण्याचा काम मंडळ करत आलेले आहे, रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळाचे बहुतांशी पदाधिकारी, सभासद हे रुग्णालय कर्मचारी असल्यामुळे कोकणातून येणाऱ्या गरीब, कष्टकरी, शेतकरी, दीनदुबळ्याना आजारपणामध्ये मदत व्हावी म्हणून अग्रेसर असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी धंदा निमित्ताने एकत्र येऊन हा दरवर्षी उपक्रम राबवला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रुग्णालय अधिष्ठाता, अधीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक तसेच इतर सर्व राजकीय क्षेत्रातील नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा देत असतात. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करत असतात. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील एक उच्चशिक्षित लोक कलावंत लोकशाहीर, प्रबोधनकार, शाहीर विकास लांबोरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष महेश चव्हाण यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष अशोक मुल्की, उपाध्यक्ष महेश चव्हाण, संतोष म्हाप्रोळकर सरचिटणीस सचिन मयेकर, खजिनदार राजेश पवार, सहसचिव सागर कुडवे, सह खजिनदार प्रसाद जेधे इतर सर्व पदाधिकांच्या सहकार्यातून हे कार्यक्रम होत असतो.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg