loader
Breaking News
Breaking News
Foto

जेसीआय इंडियाकडून खेड तालुक्यातील ११ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित

खेड (दिलीप देवळेकर) - जेसीआय इंडियातर्फे दरवर्षी देशभरातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा जेसीआय खेडतर्फे एकूण २० विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांची वार्षिक ₹३००० शिष्यवृत्तीसाठी तर मानसी नागेश दळवी हिची वार्षिक ₹१०,000 शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

₹३००० शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी: १) श्रुतिका नारायण वैराग – आयडियल स्कूल, फुरूस २) निधी नरेश दळवी न्यू इंग्लिश स्कूल, कोरेगाव ३) स्वरा संजय पालांडे सहजीवन, खेड ४) तहसिन तोफीक पोफळणकर मुकादम हायस्कूल, भरणे ५) अथर्व अरविंद शिंदे सहजीवन, खेड ६) श्रावणी गणेश पाटील आयडियल स्कूल, फुरूस ७) राज दिलीप बुरटे नवभारत, भरणे ८) शर्वरी राकेश गावडे ,फुरूस ९) कुणाल कैलास पाटील ,एल.पी. स्कूल, खेड १०) तीर्था स्वप्नील बोरसुतकर ,लोटे ₹१०,००० शिष्यवृत्ती मानसी नागेश दळवी या विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीची माहिती जेसीआय खेडचे अध्यक्ष अमर दळवी यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढील काळातही अशा शिष्यवृत्ती योजनांसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे जेसीआय खेडतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg