loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. आनंदीबाई रावराणे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन गटांमध्ये घेतलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांतील एकूण ३६ विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विश्वस्त शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, राष्ट्रीय अर्बिटर श्रीकृष्णा आदिलकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदीबाई रावराणे प्रतिमापूजन व दीपप्रज्वल करून बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम क्रमांक विघ्नेश अंकुश घाडी, द्वितीय क्रमांक शाहनवाज सादिक चोचे आणि तृतीय क्रमांक सत्यजीत सत्यवान शेळके (सर्व आचिर्णे कनिष्ठ महाविद्यालय) यांनी पटकावला. माध्यमिक विद्यालय गटात प्रथम क्रमांक राधाकृष्ण चकोर गावकर (माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे), द्वितीय क्रमांक अथर्व रमेश कुडतरकर आणि तृतीय क्रमांक ओंकार शिवदास कदम (अभिनव विद्यमंदिर, सोनाळी) यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ₹२०००, ₹१५०० आणि ₹१००० रोखरक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी विद्यार्थी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, रणनीती आणि क्रीडास्पर्धेची भावना वृद्धिंगत झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg