loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणेच्या 'बरड' एकांकिकेने पटकाविला 'राज्यस्तरीय अटल करंडक'

पनवेल :- रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या 'राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका' या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत पुणेच्या रंग पंढरी संस्थेच्या 'बरड' एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत १२ व्या पर्वातील 'अटल करंडक'वर आपले नाव कोरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्वपूर्ण वर्षानिमित्त 'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन रंगकर्मीचा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांची अभिनेते पुष्कर श्रोत्री व सुव्रत जोशी यांनी परिक्षक मनोगत मुलाखत घेतली. महाअंतिम फेरीत तब्बल २५ एकांकिकाचे परिक्षण करताना आणि त्या बघताना खूप उत्सुकता होती. विषयांचे वैविध्य होते. प्रत्येक जण आपले पोटेन्शल घेऊन स्पर्धेत उतरला होता. एकांकिका सोपे नाही कारण त्यात कला दिसते. हेवा वाटेल असे कलाकार यामध्ये बघायला मिळाले. त्यामुळे आम्हालाही यातून खूप शिकायला मिळाले. आयोजकांमध्ये नम्रता आणि सहकार्याची भावना स्पष्टपणे दिसून आली, असे मत गिरीश ओक यांनी सांगितले. अटल करंडक विषयी खूप ऐकले होते. नवीन पिढीचे लेखन कलाविष्कार पहायला मिळाले. काही कलाकारांनी तर खूप चांगले काम केले असून तरुण पिढीमुळे रंगभूमीला पुढचा आधार मिळाला आहे, असे सुनिल तावडे यांनी म्हंटले. तर प्रतिमा कुलकर्णी यांनी अशा स्पर्धेमुळे आणि संधीमुळे मराठी रंगभूमीला चांगले दिवस येणार असल्याचे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेची वाढती व्याप्ती, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रेक्षकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अटल करंडक स्पर्धेने एक तपपूर्ती गाठल्याचा उल्लेख करत त्यांनी पुढील अनेक वर्षेही या स्पर्धेवर सदैव आशिर्वाद राहावा, असे आवाहन केले. ज्येष्ठ रंगकर्मी नीनाताई कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांनी रंगभूमीसाठी केलेल्या अविरत सेवेला त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरले. त्यांची समृद्ध कारकीर्द आणि निष्ठा ही भावी कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, त्यांचा आशिर्वाद नवोदित कलावंतांना कायम लाभत राहावा, अशी मनोगतपूर्ण अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg