loader
Breaking News
Breaking News
Foto

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) - विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समाधान दिगंबर रावराणे वय 46 रा. वाभवे कोंडवाडी असे या मृत विवाहित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. मयत समाधान रावराणे यांचा स्वतःचा ट्रॅक्टर होता. दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत लाकडाच्या खोपीत ठेवलेले गवत मारण्याचे औषध प्राशन केले होते. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्याला तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र उपचारादरम्यान रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याने विषारी द्रव्य का प्रशन केले याचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा मोठा परिवार आहे. गेल्या महिनाभरात वैभववाडी तालुक्यातील चार जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. तरुण अशा प्रकारे आपले जीवन संपवत असल्यामुळे समाजात याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg