loader
Breaking News
Breaking News
Foto

करुळ चेक नाक्यानजीक कारचा अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथील पोलीस चेक नाक्यानजीक कारचा अपघात झाला. चालकाच्या शेजारी बसलेल्या लहान मुलाने अचानक कारचे स्टेअरिंग फिरवल्याने कार गटारात धडकली. अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात कारमधील प्रवासी बालंबाल बचावले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही. सदर कार कणकवलीहून कोल्हापूरकडे जात होती. करूळ घाट मार्गे जात असताना करूळ चेक नाका पासून ३०० मीटर अंतरावर पुढे बसलेल्या मुलाने स्टेअरिंग अचानक ओढले. दरम्यान गाडी रस्त्याबाहेरील गटारात धडकली. या अपघाताची माहिती मिळताच चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कारमधील सर्व प्रवाशांची त्यांनी विचारपूस केली. प्रवाशांनी आपण दुसर्‍या गाडीने जात असल्याचे सांगितले. कारचालकाने आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg