loader
Breaking News
Breaking News
Foto

कथामालेचा कै.जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार रसिका तेंडोलकर यांना जाहीर

मालवण (प्रतिनिधी) - अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं.१ येथील पदवीधर शिक्षिका रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे. रुपये पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता केंद्रशाळा आचरे नं. १ येथे होणार आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुरेश रामचंद्र गावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रसिका तेंडोलकर यांनी आपल्या ३३ वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात बालक, पालक शिक्षक आणि समाज यांच्यासाठी अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवून शाळा समाजात नेली आणि समाज शाळेत आणला. अध्यापन कार्यासोबतच आदर्श ललितलेखन, कवयित्री म्हणून त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाव आहे. सदर निवडीबद्दल साने गुरुजी कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यानी तेंडोलकर यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांचाही गौरव होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg