loader
Breaking News
Breaking News
Foto

मेव्हुणीच्या लग्नात सासरवाडीत आलेल्या जावयाचा अपमान, बदला घेण्यासाठी पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

गुरुग्राम.- सासरवाडीत झालेल्या वादाचा व केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळून टाकले. ही घटना 30 नोव्हेंबरच्या रात्री घडली. सोमवारी रोहतक पीजीआयमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तिच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून भोंडसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी पतीला अटक केली. नीतू (37 वर्ष) असे मृत महिलेचे नाव असून भोंडसी परिसरातील रायसीना येथील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी सोहना रुग्णालयात आगीमुळे भाजलेल्या महिलेचा अहवाल प्राप्त झाला. प्राथमिक उपचारानंतर तिला प्रथम गुरुग्राम आणि नंतर रोहतक पीजीआय येथे रेफर करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिस पथक पीजीआयमध्ये पोहोचले आणि महिलेचा जबाब नोंदवला. जबाबात महिलेने म्हटले आहे की, तिचे लग्न १६ वर्षांपूर्वी रायसिना येथील रहिवासी आनंदशी झाले होते. 30 नोव्हेंबरच्या रात्री आनंद दारू पिऊन घरी आला आणि त्याने भांडण सुरू केले आणि तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने घरी पार्क केलेल्या बाईकमधून पेट्रोल काढले, ते तिच्यावर शिंपडले आणि लाईटरने तिला पेटवून दिले. ती जळत्या अवस्थेत रस्त्यावर पळत आली. त्यावेळी तिचे सासरे आणि कुटुंबातील सदस्य तिथे पोहोचले व त्यांनी आग विझवली. सोमवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी सोमवारी आरोपी पती आनंद याला रायसीना गावातून अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्याच्या सासरवाडीत मेव्हणीचे लग्न होते. लग्नादरम्यान त्याचे सासरच्यांशी भांडण झाले. या रागाच्या भरात त्याने 30 नोव्हेंबर रोजी नीतूवर हल्ला केला आणि नंतर तिला जाळून टाकले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg