loader
Breaking News
Breaking News
Foto

जाणीव सामाजिक संस्थेचा सुकापूरमध्ये भव्य रोजगार मेळावा; २२ कंपन्या आणि ४००+ युवकांचा सहभाग

पनवेल :- जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल म्हात्रे ग्लोबल लर्निंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकापूर येथे भरविण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किड्स गार्डन स्कूल, सुकापूर येथे आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी अतुल म्हात्रे (आर्किटेक्ट), जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश गणेश केणी तसेच विविध नामांकित कंपन्यांचे एच.आर. प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्यात टाटा स्ट्राईव्ह, L&T, LIC, HDFC, ICICI बँक, कोटक बँक, रिलायन्स यांसह एकूण २२ प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सुमारे ४०० हून अधिक तरुण-तरुणींनी मेळाव्याला भेट देत विविध क्षेत्रातील मुलाखती दिल्या. अनेकांना याच ठिकाणी ऑन द स्पॉट जॉब ऑफर लेटर्स मिळाले असून मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी बोलताना अध्यक्ष राजेश केणी यांनी जाणीव सामाजिक संस्था आगामी काळात पनवेल तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात समाजोपयोगी उपक्रमांची उंच भरारी घेणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सदैव उभ्या राहणाऱ्या आणि लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या राजेश केणी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची सामाजिक कामगिरी अधिक बळ मिळत असल्याचे उपस्थितांच्या प्रतिक्रिया वरून दिसत होते. या कार्यक्रमाला जाणीव सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये— अतुल म्हात्रे, रोशन पाटील, विकी तसेच सिताराम म्हस्कर, किशोर पाटील, प्रभाकर केणी, स्वप्नील भुजंग, संदीप म्हसकर, संजय केणी, वामन शेळके, बाळाराम फडके, एम.सी.पाटील, संस्थेचे खजिनदार संदीप यादव, संतोष यादव, केशव चिलगर, दिनकर गुंजाळ, श्री आळवे, सागर जगताप, आकाश ढसाळ, आठवणकर, राजश्री पाटील, रिया पाटील, रेखा बागुल, श्रद्धा केणी, सायली साळुंखे, शीतल मोरे, मोहन शिंदे, अमरचंद शिवकर, प्रज्ञा उबाळे, प्रसाद पिंगळे, प्रकाश पोपटा, दीपक किरवडकर, अमित गायकर, विकास भोकरे, गुर्जर, राजेश अंबरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

स्थानिक नागरिकांनी सुकापूर परिसरात जाणीव सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून भविष्यातही अशीच रोजगारनिर्मिती आणि समाजहिताच्या कामांची अपेक्षा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg