loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री धाराई जखमाता विकास मंडळ दमामेच्यावतीने क्रिकेट स्पर्धा संपन्न

संगलट (खेड )(इक्बाल जमादार) - श्री धाराई-जाखमाता विकास मंडळ सह सुविधा महिला मंडळ संलग्न युवक मंडळ यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिर जीर्णोद्धार निधी संकलनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिवा, संदप मैदान येथे करण्यात आले होते. या उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीराम चषक २०२५ (पर्व-२) हा भव्य, दिमाखदार आणि उत्साहवर्धक असा सोहळा पार पडला.या स्पर्धेत अंतिम विजेता साई प्रतिष्ठान क्रिकेट संघ बहिरवली ठरला तर,अंतिम उपविजेता सह्याद्री क्रिकेट संघ, उन्हवरे यांनी पटकवला. तृतीय क्रमांक राधाकृष्ण क्रिकेट संघ दमामे गुरववाडी व चतुर्थ क्रमांक गोल्डन स्टार पन्हाळजे माळवाडी यांनी पटकवला.मालिकावीर म्हणून रोहित जाधव, उत्कृष्ट फलंदाज महेश बागडे व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून साई प्रतिष्ठानचा सौरभ शिगवण यांना घोषित करण्यात आलेस्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा कमेटी व युवक मंडळ यांनी मोलाची भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी ग्रामीण,पुणे व मुंबई येथून सर्व मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मंडळ यांची उपस्थिती लाभली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवक मंडळ यांनी उत्तम नियोजन व अथक प्रयत्न केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg