loader
Breaking News
Breaking News
Foto

रसायनी-कांबेत घराला आग सुदैवाने जीवितहानी टळली

रसायनी (वार्ताहर)-शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना रसायनीतील कांबे गावात घडली. आगीत म्हात्रे कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने घरातील सर्व जण समयसूचकता दाखवत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे. कांबे गावात विठ्ठल म्हात्रे आणि वसंत म्हात्रे यांचं एकमजली कौलारू घर आहे. दुपारच्या सुमारास घराच्या बाजूस कौलातून मोठ्या प्रमाणात धूर दिसल्यानंतर शेजार्‍याने आरडाओरड केली. घरात असलेले म्हात्रे कुटुंबातील सर्वजण तातडीने लाकडी वासे आणि फायबर पीओपीमुळे आग झपाट्याने वाढली. तातडीने पाताळगंगा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आग झपाट्याने वाढत घराच्या खालील बाजूसही पसरल्याने घरातील सर्व सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली. परंतु आगीमध्ये म्हात्रे कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना रसायनीतील कांबे गावात घडली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg