loader
Breaking News
Breaking News
Foto

आपत्तीमुळे आपले जीवन उध्वस्त होणार नाही याची कायम काळजी घ्यावी : डॉ.जयपाल पाटील

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुलांनी आपल्या घरामध्ये आई-वडील नसताना गॅस सिलेंडरचा वापर, इतर वीजेवर चालणाऱ्या वस्तूंचा वापर, आई बाबांची वाहने रस्त्यावर घेऊन जाऊ नये,त्यामुळे वाहन परवाना आपल्या जवळ नसल्यामुळे आई-बाबांवर गुन्हा दाखल होतो.यासाठी आपत्ती बाबत नेहमी सतर्क राहून आई-वडीलावर खर्चाची आपत्ती, आपला अनमोल जीवन उध्वस्त होणार नाही यासाठी कायम काळजी घ्यावी, असे अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील आय.ई.एस. हायस्कूलने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील, मुख्याध्यापक किरण पाटील,दर्शन प्रभु, सुनील प्रधान,राजिप प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पाटील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किरण पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ.जयपाल पाटील यांचा परिचय करून दिला.यानंतर डॉ.जयपाल पाटील यांनी संविधान वाचन करून वाहन परवाना नसतांना सुद्धा 10 मुले -मुली वाहने चालविणारी भेटली.रायगड पोलीस वाहतूक शाखेतील हवालदार साळुंके हे येऊन वाहनांचे नवीन कायद्यानुसार कारवाईची माहिती दिली.आपले जीवन जगतानां आरोग्याची चांगले रहावे.यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे,त्याच बरोबर मराठी,इंग्लिश, हिन्दी बरोबर जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, हिब्रु भाषाचे शिक्षण घ्यावे, असे भाषातज्ज्ञ सुनील प्रधान यानीं सांगितले. त्याच बरोबर सध्या मुले मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत आहेत,मात्र मोबाईल वर जास्त भर दिला जात आहे त्याचा वापर गरजेनुसार अभ्यासासाठीच करावा,माझी दोन्ही मुले कराटे मधे गोल्ड मेडल धारक झाली असुन ते आपणास धडे देतील,त्याच बरोबर मैदानी खेळ खेळत राहीलात तर शरीर मजबूत व काटक होईल.असे दर्शन प्रभु यांनी सांगितले.यावेळेस घर,वाडीमधे साप,विंचु दंश झाल्यास अथवा अपघात झाल्यास 108 रुग्णवाहिकेस बोलवावे तसेच आपल्या गावातील कोणाही महिलेस बाळंतपणास नेण्यास आरोग्य खात्यात 102 क्रमांकावर मोबाईल करावा.या दोन्ही ठिकाणी मोबाईल लावताच सिव्हिल हॉस्पिटल मधुन वाहन चालक मयुर पाटील पोहचले 20मिनिटात डाॅ.निर्मला डांगे व पायलट सुशांत पाटील पोहचले आणी श्रीमती डॉ.निर्मला डांगे यांनी 108चा वापर कसा करावा, याची माहीती दिली. यानंतर घरामधे छोटीशीच आग लागली ती कशी विझविण्यात येते त्याचे प्रात्यक्षिक डॉ.जयपाल पाटील यांनी दाखविले.कार्यक्रमास करण्यास आई.ई.एस.ची 165मुले-मुली15 शिक्षक,कर्मचारी, राजिप शाळेतील 20 मुले-मुली शिक्षिका मनिषा पाटील, आसावरी मांगलेकर या उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg