loader
Breaking News
Breaking News
Foto

35 व्या राज्यस्तरीय तायक्वांदो सिनियर क्युरुगी चॅम्पीयनशिप 2025 मध्ये रोटरीच्या विधी गोरे ला रौप्य पदक

खेड -(प्रतिनिधी) - दि. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि तायक्वॉंडो असोसिएशन लातूर यांच्या सहकार्याने लातूर येथे संपन्न झालेल्या 35 व्या राज्यस्तरीय तायक्वॉडो सिनियर क्युरुगी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विधी दिपक गोरे हिने रौप्य पदक पटकावले. सदरच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रौप्यपदक पटकावून विधी दिपक गोरे हिने आपले व रोटरी स्कूलचे नाव रोशन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विधी गोरे ही इ. 11वी मध्ये शिकत असून तिला तायक्वॉंडो खेळाची खूप आवड आहे. तिने आजवर 5 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. सदर स्पर्धेत विधी हिने रत्नागिरी, सिंधूदुर्ग, लातूर, बुलधाणा, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा अनेक जिल्ह्यातील खेळाडूंशी चुरशीची लढत देत रौप्य पदक पटकावले. तिने प्राप्त केलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विधी हिला क्रीडाशिक्षक व तायक्वॉंडो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधीचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg