loader
Breaking News
Breaking News
Foto

१३ व १४ डिसेंबरला ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विशेष कबड्डी प्रशिक्षण शिबिर

देवरूख (सुरेश सप्रे) - सचिंद्र आग्रे फाउंडेशन (रजि.) आणि जय भवानी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विशेष कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कर्ली फाटा येथे करण्यात आले आहे. शनिवार १३ ते रविवार १४ डिसें. या कालावधीत व सकाळी०९:०० ते ११:०० सायंकाळीं ०४:०० ते ०६:०० यावेळी देवरुख–रत्नागिरी रोड, कर्ली फाटा, येथे घेण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरात संजय कदम, प्रशांत साळुंखे, अक्षय बागुल, सचिंद्र आयरे, हरीशचंद्र साळुंखे, सुरेश मोरे, अशोक लोटणकर, सुरेश गोरुवले हे नामांकित कबड्डीपटू व तज्ज्ञ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या शिबिरात फिटनेस व खेळ कौशल्य विकास टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. यावर शिबीर भर दिला जाणार आहे. शिबिर पूर्णपणे विनामूल्य आहे, तरी आपल्या मुलांच्या क्रीडा भविष्यासाठी ही उत्तम संधी आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जय भवानी मंडळाचे अध्यक्ष संजय कदम यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg