loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत थंडीचे काउंटडाउन सुरूच

दापोली (प्रतिनिधी) -: आठवडाभरापूर्वी दापोलीत गुलाबी थंडीने तेरा अंश सेल्सिअस तापमानासह आगमन केले आणि पाहता पाहता गुरुवारी चक्क सहा अंशावर पारा गारठल्याने पर्यटक आता दापोलीची तुलना मनालीशी करू लागले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीत मागील तीन दिवसांपासून थंडीचा पारा घसरत चालला आहे त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे त्यामुळे जिकडे तिकडे शेक घेण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शिवाय दापोली शहरातील कपड्यांच्या दुकानात उबदार कपडे खरेदीसाठी करण्याचा कल वाढला आहे.तर सकाळच्या सत्रातील शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना थंडीच्या कडाक्यामुळे घराबाहेर पडताना उशिर होत आहे.मात्र शाळेच्या तासिका बुडू नयेत यासाठी हुडहुडीतूनही मुले बाहेर पडत आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कुडकुडया थंडीमुळे शेती कामाची गती चांगलीच मंदावली आहे . त्यामुळे सर्वच दैनंदिन कामकाजावर थंडीच्या कडाक्याचा एकुणच परिणाम झाला आहे. मात्र समुद्र किनाऱ्यावर भटकंती करिता आलेले पर्यटक या गुलाबी थंडी चा चांगलाच आनंद घेत आहेत त्यांना दुखावल्या सारखे झाले आहे. त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाल्यामुळे त्यांची पर्यटन सफर चांगलीच सफल झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg