loader
Breaking News
Breaking News
Foto

स्टार स्वरोजगारतर्फे एम्ब्रॉयडरी, आरी वर्क, फॅब्रिक पेंटींग प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी, : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानतर्फे रत्नागिरीत एम्ब्रॉयडरी, आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटींग प्रशिक्षण दि. 22 डिसेंबर ते 21 जानेवारी 2026 या 31 दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात एम्ब्रॉयडरी हैंड एम्ब्रॉयडरी, शेंडो वर्क, पॅच वर्क, कटवर्क, आपलिक वर्क, जर्दोसी वर्क, रिबन वर्क, मिरर वर्क, स्मोकिंग वर्क, सिक्लिन वर्क, मणी वर्क, मिरर वर्क, आरी वर्क. विविध ट्रेंडीशनल एम्ब्रॉयडरीकांथा, कच्छ, चिकनकारी, कमल कडाई, कश्मिरी, कसुती. विविध एम्ब्रॉयडरी स्टीचेसरन, बँक, स्टेम, क्रॉस, हेरिंगबोन, चेन, सॅटिन, फ्लाय, लीफ, फिदर, फिशबोन, बटनहोल, झिग झंग, ब्लॅकेट, पेकिनीज, गाठ, बँक, विण स्टीचेस इत्यादी. विविध फॅब्रिक पेंटिंग नीब पेंटिंग, थ्रीडी पेंटिंग, बटिक पेंटिंग, ब्लॉक पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, वारली, मधुबनी, कलमकारी, पिचवाई, कॅनव्हास पेंटिंग इत्यादी. शिकवण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे मोफत प्रशिक्षण असेल. चहा, नाष्टा, जेवण व राहण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे. तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. उद्योजगता व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण ते 50 वर्ष पर्यंत असेल. उमेदवार रत्नागिरी जिल्हाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवार उमेद बचत गटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच अल्प उत्पन्न गटाचा असल्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणाची वेळ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असेल. नोंदणीसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला यांच्या प्रत्येकी झेरॉक्स, फोटो अशा कागदपत्रांसह उमेदवारांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, निसर्ग वसाहत, शांतीनगर, वक्रतुंड अपार्टमेंट जवळ, नाचणे रोड येथील कार्यालयात आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 9284034438 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg