loader
Breaking News
Breaking News
Foto

भारती विद्यापीठ इंग्रजी प्रज्ञाशोध परीक्षेत चिन्मयी खानोलकर राज्यात तिसरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - भारती विद्यापीठातर्फे सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी प्रज्ञाशोध परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज दोडामार्गने उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षीही राखली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी खानोलकर चिन्मयी जयसिंग हिने इंग्रजी ॲडव्हान्स्ड् परीक्षेत राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण 77 विद्यार्थ्यांपैकी 68 विद्यार्थी पास झाले. एकूण निकाल 88.31% लागला. पास झालेल्या 68 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही.बी.नाईक, खजिनदार सी एल नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय पाटी , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षक अभिजीत उराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg