loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी: ओवळीये जंगलात शिकाऱ्याच्या गोळीबारात एकाचा मृत्यू प्रकरणी वाहनं व बंदुक जप्त

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ओवळीये जंगलात शिकारीसाठी वापरलेली बंदुक आणि ज्युपिटर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ओवळीये गावाच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या सचिन सुभाष मर्गज (२८) या तरुणाचा, जनावर समजून करण्यात आलेल्या गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिप्रियान डाॅन्टस नावाच्या बंदुकधारी व्यक्तीला अटक केली असून त्याला ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सिप्रियान डाॅन्टस याने शिकारीच्या वेळी जनावर समजून सचिन मर्गज यांच्यावर गोळी झाडली. गोळी अचूक लागल्याने सचिन जागेवरच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मयत सचिन मर्गज यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ​शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत आहे .सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि कोल्हापूर येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा नेम आणि जखमांचा अचूक तपशील अहवालानंतर स्पष्ट होईल. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात संशयित आरोपीने वापरलेला महत्वाचा मुद्देमाल जप्त केला आहे.​ डबल बॅरल काडतुसची बंदुक, ज्युपिटर दुचाकी (शिकारीसाठी जाताना वापरलेली) जप्त केली आहे.

टाइम्स स्पेशल

ओवळीये जंगलात शिकारीसाठी गेलेले सचिन मर्गज आणि सिप्रियान डाॅन्टस हे दोघेच होते, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, गावातील लोकांनी यावर शंका व्यक्त केली आहे. ​ शिकारीसाठी 'रान' काढताना ५ ते १० लोक असतात, त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा संशय गावातील लोकांनी व्यक्त केला आहे. ​याबाबत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ​संशयित आरोपी सिप्रियान डाॅन्टस सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस अधिक तपास करत आहेत की, शिकारीसाठी जाताना त्यांच्यासोबत आणखी कोण होते किंवा कसे? हे तपासले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg