loader
Breaking News
Breaking News
Foto

श्वेता बंदरे-कामेरकर स्टार एजुकेशन सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

पनवेल (प्रतिनिधी) - नेरुळ येथील गुरुवर्य बाळाराम पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या श्वेता विकास बंदरे यांना स्टार एज्युकेशनचा सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्कार देण्यात येवुन सन्मान करण्यात आला. श्वेता बंदरे - कामेरकर ह्या मुंबई नेरुळ येथील गुरुवर्य बाळाराम पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. त्या संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावच्या सुकन्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्टार एज्युकेशनतर्फे दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्वेता यांचे शालेय शिक्षण कै. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली येथे झाले. तर देवरूखातील आठल्ये-सप्रे काँलेज मधून बी. ए. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी साडवली च्या पराग बी.एड कॉलेज येथे बी.एड च शिक्षण पूर्ण केले. श्वेता बंदरे-कामेरकर यांनी नेरुळ येथील बाळाराम पाटील स्कूल मध्ये काम करताना प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापक पदावर काम करताना सर्व सहकारी वर्गाला बरोबर घेत प्रशालेचे व विद्यार्थी वर्गाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवित शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक उंचावण्याचा सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्या गत १० वर्षातील कारकीर्दीतील अद्वितीय कार्याची स्टार एज्युकेशन संस्थेने दखल घेत सर्वोत्तम मुख्याध्यापक हा पुरस्काराने सन्मानित केले.

टाइम्स स्पेशल

मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल संस्था अध्यक्ष संदिप पाटील. माजी मंत्री रवींद्र माने. पराग संस्थेचे सचिव व माजी आम. सुभाष बने. संचालक पराग बने. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे. देवरूख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आदींनी अभिनंदन केले आहे. संगमेश्वर तालुक्यासह नवी मुंबई. नेरुळ परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg