loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर समुद्रकिनारी भरतीत स्कॉर्पिओ अडकली; पर्यटकांची बेफिकिरी, वाहनाचे मोठे नुकसान

संगलट खेड (प्रतिनिधी) - गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात अडकले. वाढत्या भरतीच्या पाण्यामुळे वाहन काही वेळातच समुद्रात फसले. मात्र जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढण्यात पोलिस व ग्रामस्थांना यश आले. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला भरती ओसरल्यानंतर वाहन काढता येईल या अपेक्षेने तरुणांनी रात्री नऊ वाजेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची पातळी अधिक वाढू लागल्याने अखेर त्यांनी आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधला. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg