loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवली जुनियर कॉलेजमध्ये खाद्य महोत्सव जल्लोषात साजरा

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेतील जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी नुकताच खाद्य महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी तळवली ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी विविध डेज साजरे करतात. यामध्ये खाद्य महोत्सव हा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. या खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार श्रीमती सुजाता चव्हाण, सहसचिव महेश कोळवणकर, मनोज नायर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रदीप चव्हाण, मुख्याध्यापक एम.ए.थरकार, प्रा. अमोल जड्याळ, यांच्यासह सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. यामध्ये भेळ, शेवपुरी, कच्ची दाबेली, आलूवडी, कोथिंबीर वडी, चिकन पुरी, चिकन बिर्याणी, चिकन रोल, लॉलीपॉप, वडापाव, अंडा ब्रेड, लस्सी, आईस्क्रीम असे नाना विविध प्रकारचे पदार्थ स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्याला प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळे स्टॉल धारक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसत होते. खाद्य महोत्सवतून विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. या खाद्य महोत्सवात 11 वी, 12 वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना प्रा. अमोल जड्याळ, प्रा. सौ.कांबळे, प्रा.कु. सावंत मॅडम, गुरुनाथ कारेकर, अंकुश पिलवलकर यांचे मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभले. खाद्य महोत्सव यशस्वी केल्याबद्दल प्राचार्य एम. ए.थरकार यांनी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg