loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन

वरवेली (गणेश किर्वे) - आपल्या अवतीभवती घडणार्‍या गोष्टी का घडतात? यातून जिज्ञासू वृत्ती वाढावी, यासाठीच हे विज्ञान प्रदर्शन भरविले जात आहे. अशा प्रदर्शनामधून भविष्यात गुहागर तालुक्यातून संशोधक घडावेत असे प्रतिपादन गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शृंगारतळी येथे पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये गुहागर तालुका ५३ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमातून ते बोलत होते. या विज्ञान प्रदर्शनाचे शुभारंभावेळी शृंगारतळी बाजारपेठेमधून विज्ञान ग्रंथ दिंडी काढण्यात आली. लेझीम पथक, झांज पथक विद्यार्थी, ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक वर्ग यांच्या सहभागाने काढण्यात आलेली विज्ञान ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. अंतराळ यानाची प्रतिकृतीचे प्रक्षेपण गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विज्ञान प्रदर्शनामध्ये १०२ प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली. यामध्ये प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक १६ प्रतिकृती, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक ४ प्रतिकृती, माध्यमिक विद्यार्थी साहित्य १७ प्रतिकृती, प्राथमिक विद्यार्थी ५९ प्रतिकृती, दिव्यांग माध्यमिक विद्यार्थी ३ प्रतिकृती, दिव्यांग प्राथमिक विद्यार्थी ०१ प्रतिकृती आणि प्रयोग सहाय्यक २ प्रतिकृती यांचा सहभाग होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg