loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात 'पारिजात भित्तिपत्रक' प्रकाशन सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाङमय मंडळ व मराठी विभागाच्यावतीने प्र.प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांच्या उपस्थितीत मनाली बावधनकर यांचे हस्ते पारिजात भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना कु. वसुंधरा रोहिलकर हिने आजच्या आधुनिक युगामध्ये वाचन व लेखन संस्कृती लोप पावत असल्याचे सांगून आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन संस्कृती वाढावी, रुजावी भावी विद्यार्थी सुसंस्कारीत व्हावा. त्यातूनच एखादा लेखक, साहित्यिक घडावा अशी भूमिका वाङमय मंडळाची असल्याचे सांगितले. तशी विद्यार्थ्यांकडून आशा व अपेक्षा वाङमय मंडळाची असल्याचे म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनाली बावधनकर यांनी आपल्या प्रमुख मागर्दर्शनातून भित्तिपत्रक म्हणजे बालपणातील रुजलेला आरसा, मनाचा ठाव घेणारे पत्रक असते असे म्हटले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असून विद्यार्थ्यांनी महाव्द्यिालयीन जीवनात सामाजिक भान जपत समाजाचे संवेदनशील पद्धत्तीने निरीक्षण करून विविध प्रकारचे लेखन केले पाहिजेत. त्यासाठी साहित्यिकाची भाषा म्हणजे समुद्रातून एखादा मोती निवडावा तशी साहित्यिक भाषेचा वापर करत असतो. इंग्रजीतील लव या एकाच शब्दासाठी मराठीतील प्रेम, माया, जिव्हाळा, अनुलोप, स्नेह असे विविध प्रकारचे कितीतरी शब्द आहेत. त्याचा उपयोग साहित्यिक कितीतरी कुशलतेने करत असतो. अशा प्रकारच्या विविध उदाहरणांतून त्यांनी सांगितले. पारिजात म्हणजे प्राजक्त. आपल्या मनातील विचारांचा लेखना्‌द्वारे पारिजातकाच्या फुलांसारखा सडा पडावा असे भरभरून आपण लेखन करावे. अशी आशा व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg