loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर चे सुपुत्र हेरंब भिडे, राष्ट्रीय तायक्वांडो पंच म्हणून तेलंगणा कडे रवाना

संगमेश्वर - तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तेलंगणा तायक्वांडो असोसिएशनच्या विद्यमाने ४१ वी राष्ट्रीय सिनिअर क्योरुगी आणि १४ वी राष्ट्रीय सिनिअर पुमसे तायक्वांडो चॅंपियनशिप स्पर्धा हैद्राबाद येथे होणार आहे. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरच्या दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो असो. शी संलग्न लायन्स तायक्वांडो क्लब, संगमेश्वरचे हेरंब प्रसाद भिडे यांची नियुक्ती पुमसे प्रकाराचे राष्ट्रीय पंच म्हणून करण्यात आली आहे. आज बुधवार रोजी हेरंब भिडे या स्पर्धेसाठी हैद्राबाद येथे रवाना झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून पुमसे प्रकारासाठी हेरंब भिडे हे एकमेव पंच असणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर तायक्वांडो असो. चे सचिव शशांक घडशी यांच्या मार्गदर्शनात हेरंब यांनी ब्लॅक बेल्ट प्राप्त केला होता. त्यानंतर मागील वर्षी त्यांनी पुमसे पंच परिक्षा बंगळूरू येथून उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला होता. या आधी त्यांनी तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली असून नुकतेच जिल्हा आणि राज्य स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत पंच होण्याचा बहुमान मिळाला आहे! हेरंब यांना मार्गदर्शक म्हणून संगमेश्वर तालुका प्रमुख प्रशिक्षक तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शशांक घडशी, लायन्स संगमेश्वर तायक्वांडो क्लबचे प्रशिक्षक साईप्रसाद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तसंच लायन्स तायक्वांदो क्लब अध्यक्ष दिलीप रहाटे, लायन्स अध्यक्ष रवींद्र शिंदे, सरपंच विवेक शेरे , सुशांत कोळवणकर , मनोहर भिडे व पालक वर्ग यांच्याकडून हेरंब भिडे यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे. हा क्षण समस्त संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाचा आहे. रत्नागिरीचे नाव असेच उज्जवल करण्यासाठी हेरंब प्रसाद भिडे ह्यांना हार्दिक शुभेच्छा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg