loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुकांना अद्यापही वेळ आहे. त्यामुळे महायुतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात कोकण विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्याने निवडणुक लढविण्यासाठी पूर्व तयारी करावी लागते ती केली पाहिजे, त्याचा फायदा हा नेहमी महायुतीला होतो असे चव्हाण म्हणाले. महापालिकेच्या निवडणुका अंतिम टप्यात होणार आहे. अद्याप वेळ आहे, त्यामुळे महायुतीचा निर्णय देखील वरीष्ठ पातळीवर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला संगमेश्वर भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी हजेरी लावली होती त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की आमची प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समवेत बैठक झाली उत्तर मंडळातील विकासकामांचा आढावा घेतला पक्षांतर्गत कामाचा आढावा घेतला तसेच तिकीट कोणाला द्यायची हे वरीष्ठ पातळीवर ठरेल परंतु तुम्ही पक्षाचे कामं जोमाने करा नागरिकांच्या समस्या असतील तर त्या सोडविण्या साठी प्रयत्न करा असे आदेश देण्यात आले असल्याचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg