माणगाव (रायगड) (वार्ताहर) : रायगडात लोणेरे येथे २२ वर्षीय पल्लवी मोरे या युवतीचा अतिशय कू्ररपणे खून करण्यात आला. आरोपीला नवी मुंबई येथे अटक करण्यात यश आले. अनिस मोहम्मद खान मालदार (वय ३८ ) असे या संशयित आरोपीचे नाव असून तो मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तळवडे गावचा रहिवासी असून सध्या तो नवी मुंबईत मुंब्रा येथे राहतो. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी सारी तपासाची सुत्रे वेगाने फिरवली आणि त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुळचा लांजातील तळवडे गावचा रहिवासी असणारा अनिस मोहम्मद खान मालदार हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे अनिसने स्वतःच्याच २ वर्षाच्या मुलीची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना दिली. काही वर्षांपूर्वी तो तळवडे सोडून मुंब्रा येथे राहयला आला होता अशी माहिती देखील पोलिसांनी पत्रकारांना दिली.
सोमवारी २० एप्रिलला पल्लवी मोरेचा खून झाल्याचे उघडकीस आले त्याच दिवशी पोलिसांनी आरोपी हा रत्नागिरी जिल्ह्यातील मुळचा रहिवासी असावा अशी माहिती आपल्या तपासाच्या कौशल्यातून मिळवली होती. लॉजवर रुम बुक करताना या तरूणीसोबत आलेल्या इसमाकडे रत्नागिरी जिल्ह्याचा पत्ता असणारे आधारकार्ड होते अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे रायगड पोलीस व रत्नागिरी पोलीसांचे पथक याप्रकरणी शोध घेत होते. आरोपीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली असून पोलिसांनी वेगाने तपास करत त्याची सारी कुंडलीच समोर आणली आहे. लोणेरे येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ओमकार रेसिडेन्सी येथे दि. २० एप्रिल रोजी रुम नंबर १०१ मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने लॉज चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला होता. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करताच एक तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली होती. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल होते. या मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे (वय २२) रा.वडगाव बौध्दवाडी, ता.माणगाव असे असल्याचे तपासात केले आहे. मुलीची हत्या दरम्यान गोरेगाव पोलिस ठाणे येथे संशयित आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार (वय ३८) याच्या विरोधात हत्या, लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी आरोपी गाव सोडून मुंब्रा येथे राहायला गेला होता. स्वतःच्या मुलीच्या हत्येप्रकरणी काहीकाळ कारागृहातदेखील होता. आरोपीला पोलिसांनी फिल्मीस्टाईलने नवी मुंबईतून अटक केली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आरोपीच्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
तपासासाठी रायगड आणि रत्नागिरी पोलिसांची चार पथके सध्या प्रयत्नशील आहेत. सीसीटीव्ही चेक करण्यासाठी एक वेगळं पथक प्रयत्न करत आहे. त्या लॉजचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, पण आजूबाजूचे काही सीसीटीव्ही फुटेज मिळू शकते का? ते बघितले जात आहे. आरोपीची हुशारी! त्याव्यतिरिक्त रूममध्ये जे जेवणाचे पार्सल पडलेले होते, ते आजूबाजूच्या हॉटेलवरून आणलेले असावे, त्या संदर्भानेही शोध घेतला जात आहे, आणि तिथे काही सीसीटीव्ही फुटेज मिळते का, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. आतापर्यंत जी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, लॉजमालक आणि काउंटरवर काम करणार्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवरून ही गोष्ट निष्पन्न होते. की यामध्ये फक्त एकच आरोपी आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी महाड शंकर काळे यांनी दिली.




































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)


































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.