रत्नागिरी : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नगर पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला नगर परिषदेचा संपूर्ण कारभार आधुनिक इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. या जुन्या आणि जिर्ण झालेल्या इमारतीच्या निर्लेखनाचे प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मंत्री उदय सामंत यानी दिलेल्या आदेशानुसार १ मे ला या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
इमारतीचे किरकोळ राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सध्या ७० ते ८० कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. इमारतीमधील सौर ऊर्जा फर्निचर आणि सिलिंगचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. स्थापत्य कामासोबतच विद्युत जोडणी आणि रंगकामाचा वेगही वाढवण्यात आला आहे. या इमारतीचे काम काही काळ तांत्रिक कारणांमुळे आणि दोन कंपन्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे रेंगाळले होते. मात्र, महिनाभरापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अचानक इमारतीची पाहणी केली. १ मे पर्यंत काम पूर्ण न झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी संबंधित कंपन्यांना दिला होता. या इशाऱ्यानंतर कामाला मोठी गती मिळाली आहे. नवीन इमारतीत कामकाज सुरू करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. येत्या १५ ते २० एप्रिल दरम्यान सर्व महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स आणि कार्यालयीन साहित्य नवीन इमारतीत हलविण्यात आली. एकदा नवीन इमारतीत कामकाज स्थिरावले की, जुनी जीर्ण झालेली इमारत निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुन्या इमारतीचे छत काढण्याते काम सुरू झाले आहे हळुहळु ही इमारत आता जमिनदोस्त करण्यात येणार आहे.





































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.