loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार भास्करराव जाधव यांनी केली चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी आज मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादुरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या सगळ्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देखील त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, चिपळूण रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष बाळा आंबुर्ले, नगरसेवक विकी नारळकर, फैसल कास्कर आदी त्यांच्यासोबत होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता नाजीम मुल्ला, शाखा अभियंता शाम खुनेकर, ब्लूम कंपनीचे टीम लीडर श्री. वाय. एस. राव, स्ट्रक्चरल इंजिनियर अमोल कारंडे, ब्रिज इंजिनियर अर्जुन छत्तोराय, प्रोजेक्ट मॅनेजर सातपुते, सुरक्षा अभियान शहाबुद्दीन रशीद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg