पनवेल :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षप्रमुख स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर संघटनात्मक पातळीवर पक्षगळती वाढत असल्याचे दिसून येत आहे. मनोज व्यवहारे, सुभाष मालपाणी आणि सचिन जाधव या पदाधिकाऱ्यानी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) अजितदादा पवार यांची भेट घेऊन आपले राजीनामे सादर केले होते. त्यावेळी अजितदादा यांनी संयमाची भूमिका घेत निर्णय लांबवला होता. मात्र, अजितदादा पवार यांनी ते राजीनामे स्वीकारले नव्हते. त्यांच्या निधनानंतर कोणतीही सविस्तर चर्चा न करता हे राजीनामे मंजूर करण्यात आल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर असंघटित कामगार विभागाचे मनोज व्यवहारे, वाहतूक विभागाचे सचिन जाधव आणि उद्योग विभागाचे सुभाष मालपाणी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे पार पडला. एकनाथ शिंदे हे सामान्य पार्श्वभूमीतून आलेले सर्वमान्य नेतृत्व आहे आणि काम करणाऱ्या माणसाला न्याय देतात, त्यामुळे त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो आम्ही सार्थ करू आणि पक्ष तळागाळापर्यंत नेण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी मनोज व्यवहारे यांनी दिली आहे.





































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.