सावंतवाडी : शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण अशा ५ विकासकामांचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषद हद्दीतील विविध पाच महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन यावेळी संपन्न झाले. यामध्ये रस्ते, गटारे आणि नाल्यांच्या बांधकामाचा समावेश असून यामुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत.
नगराध्यक्षांच्या हस्ते पंचायत समिती ते बिद्रे कोल्ड्रींक या मार्गावर सुसज्ज गटार बांधकाम करणे, शिवउद्यान येथील उर्वरित नाल्याचे प्रलंबित बांधकाम पूर्ण करणे, सालईवाडा मेन रोड ते राजा स्वार यांच्या घरापर्यंत रस्ता पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभीकरण, जिकर मेमन यांच्या घराजवळ बंदिस्त गटार बांधणे व दिलीप भालेकर यांच्या घरापासून गावडे यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम करून त्यावर प्रिकॉस्ट फरश्या बसवणे आदी कामांचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा व्हावा या दृष्टीने ही गटार बांधकामे अत्यंत महत्त्वाची आहेत. काम दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यावर आमचा भर आहे असे मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले. याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, पर्यटन सभापती मोहीनी मडगावकर, नगरसेविका सुकन्या टोपले, नगरसेवक तौकीर शेख आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.




































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)


































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.