सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई जाणवत आहे. येत्या चार दिवसात नगर परिषदेने पाणीटंचाई बाबत ठोस कृती केली नाही तर महिला घागर घेऊन नगरपरिषदेवर आक्रोश मोर्चा काढतील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी दिला यावेळी महिला शिवसेना जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका ॲड. नीता कविटकर सावंत यांनी देखील नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारावर बोट ठेवले.
आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयामध्ये शिवसेना नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सावंतवाडी शहरात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे .यावेळी नगरसेवक संजू परब, नगरसेविका अँड नीता कविटकर सावंत, शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावले, देव्या सूर्याजी, शर्वरी धारगडकर, अँड सायली दुभाषी, स्नेहा नाईक ,क्लेटस फर्नाडिस, अर्चित पोकळे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
संजू परब म्हणाले, सावंतवाडी शहरात एप्रिल महिन्यामध्ये यापूर्वी कधीही पाणीटंचाईचा वणवा जाणवला नाही. यावर्षी तो जाणवतोय. गॅस आणि पाणीपुरवठा लाईन खोदाईमुळे काही ठिकाणी पाईप तुटले आहेत तेथे दुरुस्ती झालेली नाही किंवा पाणी गळती होत आहे त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे लक्ष जनता वेधत आहे. तरीही दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला जनतेने निवडून दिल्यामुळेच आम्हाला नगरपरिषदेला वेळ देऊन घागर मोर्चा काढण्याचा इशारा द्यावा लागतो आहे. नगरपरिषदेच्या लाईन खुदाईच्या वेळी काम केले आहे ते पूर्ण झाले नाही जेथे खुदाई करणार तेथे काम पूर्ण करा पाईपलाईन टाका वगैरे आम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याबाबत सूचना दिल्या मात्र त्या पाळल्या गेल्या नाहीत पाणी समस्येची जबाबदारी नगराध्यक्ष आणि प्रशासनाची आहे. येत्या चार दिवसात सावंतवाडी शहरात पाणीटंचाईची सोय झाली पाहिजे. सावंतवाडीच्या शहरात अनेक ठिकाणी पाणी येत नाही किंवा काही ठिकाणी पाईपलाईन तुटलेली आहे. पाणी वेळ बदलली म्हणून पाणी मिळेल असे नाही वेळ बदलून पाणी येणार असेच नाही. प्रशासनावर नगराध्यक्षांचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला हा घागर मोर्चा काढावा लागत आहे. येत्या चार दिवसात पाण्यावर योग्य नियोजन करावे नाहीतर महिला घागर मोर्चा काढतील असा इशारा संजू परब यांनी दिला.





































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.