मालवण (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील गावागावात आणि वाडीवस्तीत एक तरी भोंदू बाबा आणि जादूटोणा करणारे असून त्यांची माहिती त्या त्या गावातील पोलीस पाटील यांना असते. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण आयोजित केल्यास कोण कोण या कायद्याचे उल्लंघन करतात याची सविस्तर माहिती पोलीस पाटील यांच्याकडून पोलिस यंत्रणेला मिळू शकते, त्यामुळे पोलीस पाटील यांच्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक दहिकर यांनी जिल्ह्यात लवकरच पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण आयोजित करू, असे आश्वासन दिले.
राज्यात अशोक खरात आणि अन्य भोंदू बाबांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात खरात निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी आणि जिल्ह्यात प्रभावीपणे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंबलबजावणी PIMC स्थापन केली असून या समितीने हा कायदा प्रभावीपणे जिल्ह्यात राबवायचा आहे, असे सांगितले. जिल्ह्यातील गावागावात आणि वाडीवस्तीत भोंदू बाबा असून याची माहिती त्या त्या गावातील पोलिस पाटील यांना असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांचे जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणी विजय चौकेकर यांनी दहिकर यांच्याकडे केली. तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग यांनी २०१६ सालीच सर्व अधिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना दक्षता अधिकारी म्हणून नियुक्त करावे, असे आदेश काढले आहेत. या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष स्थापन करावा व या कक्षामध्ये जिल्ह्यातील अशा भोंदूबाबा व जादूटोणा करणाऱ्यांची माहिती संकलित करावी अशी मागणीही चौकेकर यांनी केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी जिल्ह्यात अभाअंनिस चांगले काम करीत असल्याचे सांगत या कामासाठी जेथे जेथे पोलिस सहकार्य लागेल तेथे सहकार्य पोलिस करतील, असे सांगितले. तसेच लवकरच जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांचे जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. या प्रशिक्षणास अभाअंनिसच्या पदाधिकाऱ्यांना बोलविले जाईल. पोलिस पाटील यांच्या मार्फत गावागावातील भोंदू बाबा आणि जादूटोणा करणाऱ्यांची माहिती संकलित केली जाईल तसेच जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन केला जाईल, जिल्ह्यात खरात सारखे भोंदू बाबा निर्माण होणार नाहीत याची वेळीच उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दहिकर यांनी दिल्याची माहिती विजय चौकेकर यांनी दिली. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या या सहकार्याबद्दल अभाअंनिस सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले आभार मानले आहेत.





































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.