loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळंब येथे २५ रोजी आरोग्य तपासणी व एक्स-रे शिबीर

मालवण (प्रतिनिधी) - कोळंब येथे 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या संकल्पनेतून उपकेंद्र कोळंब यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व एक्स-रे शिबिराचे. आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे होणार आहे. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, एक्स-रे सेवा तसेच डॉक्टरांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रक्तदाब व रक्तातील साखर (शुगर) तपासणीची सुविधाही नागरिकांना मिळणार आहे. शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले आधारकार्ड व मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी-९४०३६४०४३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, गावातील प्रत्येक नागरिकाने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg