मालवण (प्रतिनिधी) - कालावल खाडीपात्रातील अवैध वाळू उपशा विरोधात काही दिवसापूर्वी तळाशील ग्रामस्थांनी प्रखर आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर तोंडवळी तळाशील समोरील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या खाडी पट्ट्यात अधिकृत वा अनधिकृत वाळू उपशाला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी दुपारी आयोजित तोंडवळी गावच्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र भावना मांडून या भागात वाळू उपशाला एकमुखी विरोध दर्शवला. मालवणचे नायब तहसीलदार यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या या ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून वाळू उपशाला तीव्र विरोध दर्शवत वाळू उपशा विरोधात ग्रामसभेचा एकमुखी ठराव मंजूर केला. या ठरवाचा व ग्रामस्थांच्या भूमिकेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित मालवण नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांनी ग्रामसभेला दिली. यावेळी मोठया संख्येने महिला पुरुष ग्रामस्थ ग्रामसभेस उपस्थित होते. तोंडवळी तळाशील ग्रामस्थांनी शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या भागांमध्ये होणाऱ्या अधिकृत वा अनधिकृत वाळू उपशाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन उभे केले होते. त्यावेळी आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सदर खाडी पट्ट्यात वाळू उपसा बंद होईल असे सांगत आंदोलन स्थगित करण्यास सांगितले होते. आमदार राणे यांच्याशी झालेल्या विशेष चर्चेतून ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले होते. यावेळी ग्रामसभा घेऊन गावाची भूमिका शासनाकडे सादर करावी असे सूचित करण्यात आले होते.
तोंडवळीच्या ग्रामसभेत कालावल खाडी पात्रातील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या ठिकाणी होत असलेला वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच या ठिकाणी शासनाने अधिकृत किंवा अनधिकृत वाळू उपसा करू देऊ नये, यासाठी तोंडवळी गावची विशेष ग्रामसभा बुधवारी दुपारी ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच स्नेहा तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मालवण महसूलचे नायब तहसीलदार विनायक जांभेकर निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच माजी सरपंच आबा कांदळकर, पं. स.सदस्य गणेश तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत अधिकारी युती चव्हाण, सदस्य नरेंद्र मेस्त, स्नेहल केळुसकर, स्नेहल पाटील, अनन्या पाटील, मानसी चव्हाण, सुजाता पाटील, ज्ञानेश गोलतकर, भुपाल मालंडकर, जयहरी कोचरेकर, संजय केळुसकर, संजय तारी, ताता टिकम, मंडळ अधिकारी उमेश सिगनाथ तलाठी प्रकाश गायकवाड, पोलीस पाटील मुळे, तोंडवळी गावातील महिला, पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी अधिकृत व अनधिकृत वाळू उपसा विरोधात एकमुखी ठराव घेत वाळू उपसासाठी गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला.
यावेळी नायब तहसीलदार विनायक जांभेकर ग्रामसभेत माहिती देताना म्हणाले, वाळू उपसा विरोधात मांडलेल्या ग्रामस्थांच्या भूमिका आपण ऐकून घेतल्या असून वाळू उपशा विरोधात घेण्यात आलेल्या ठरावाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. विशेष ग्रामसभेतील ग्रामस्थांच्या तीव्र भावना आपण जाणून घेतल्या आहेत. महसूल विभागाकडून कारवाईसाठी पथके नेमण्यात आली असून यामध्ये चार तलाठी व एक मंडळ अधिकारी व इतर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कोणत्याही अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकी विरोधात कार्यवाही सुरू आहे. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे त्यांनी ग्रामभेत सांगितले. खार बंधाऱ्यासंदर्भात ग्रामस्थांनी मांडलेल्या भूमिकेबाबत मालवण तहसीलदार यांच्याकडून संबंधित विभागाला पत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेरीटाईम बोर्ड कडून करण्यात येणाऱ्या सर्व्हेची माहिती ग्रामपंचायतला दिली जात नाही, यापुढे सर्व्हे करावयाचा असल्यास ग्रामपंचायतला माहिती द्यावी, त्यानंतरच सर्व्हे करावा, अशी मागणी या सभेत ग्रामस्थांनी केली.





































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)


































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.