loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मुसाड ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

खेड - खेड तालुक्यातील पाली, निरबाडे, मुसाड, कुरवळ-खेड, कुरवळ-जावळी या मुख्य रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. सदर रस्ता हा परिसरातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवा या रस्त्यावरुन ये-जा करत असतात. मात्र या रस्त्याची खराब अवस्था लक्षात घेता अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत असतें. या संदर्भात संबंधित विभागाकडे अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करुंन सुद्धा दखल घेतली जात नाही. सदर रस्त्याची पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल. अन्यथा लोकशाही मार्गाने दिनांक २८ एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg