loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणमधील नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते ३१ मे या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या सोहळ्या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसहीत देवीला कुंकूमार्चन तसंच आयोजकांकडून ५ वर्षे ते ९ वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न होणार आहेत. हे सर्व विधी 'संपूर्णपणे निःशुल्क' असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे येथील सुप्रसिद्ध निरुपणकार प्रणव गोखले यांचं संध्याकाळी ४:३० ते ८:३० या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण होईल. सोमवार, १ जून रोजी मूर्ती विसर्जन मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होणार आहे. या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सचिन वझे प्रीती वैद्य, गजानन अभ्यंकर, शुभदा अभ्यंकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

श्री देव नारायण मंदिराचे नित्य पुरोहीत सुमेध जोशी यांचे या सोहळ्याला सक्रीय योगदान आहे. या सोहळ्याला मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गांवकर मंडळी यांचे सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg