loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी होणार, आचारसंहितेचा अडथळा नाही

मुंबई - शेतकर्‍यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा ३० जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व चर्चावर पडदा टाकत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी बिगुल वाजवले आहे. २५ जूनपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नेमकी याच काळात कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याने, आचारसंहितेच्या नियमांमुळे ही प्रक्रिया रखडणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. या निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक असली तरी कर्जमाफीच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे समजते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg