loader
Breaking News
Breaking News
Foto

‘शहीद-ए-आझम भगतसिंग यांचा पुतळा योग्य ठिकाणी पुन्हा बसवणार’ – महापौर डिंपल मेहता यांचे आश्वासन

मिरा-भाईंदर : भाईंदर पूर्व-पश्चिम मार्गावरील शहीद भगतसिंग यांचा पुतळा पुन्हा स्थापित करण्यासाठी मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज महापौर डिंपल मेहता यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे शहर प्रमुख घनश्याम आंबोकर, कार्यकारिणी सदस्य साबीर शेख व राजन नेरुरकर, ओ.पी. सिंग, सुभाष पांडे, शेषमणी यादव आदी मान्यवर उपस्थित होते. शिष्टमंडळाने महापौरांना सविस्तर माहिती देताना सांगितले की, सदर पुतळा 22 वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका प्रशासनाच्या सहमतीने बसवण्यात आला होता व सुशोभिकरणही करण्यात आले होते. मात्र, आता तो ‘अवैध’ ठरवला जात आहे. शहीद भगतसिंग हे देशाचे वीर स्वातंत्र्य सेनानी असून त्यांचा अवमान होऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर डिंपल मेहता यांनी मूलभूत अधिकार संघर्ष समितीला आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, “शहीद भगतसिंग यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या पुतळ्याबाबतची संपूर्ण कागदपत्रे तपासून, नियमानुसार योग्य त्या ठिकाणी पुतळा सन्मानाने पुन्हा बसवण्यात येईल. प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले जातील.” महापौरांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर शहर प्रमुख घनश्याम आंबोकर म्हणाले, “महापौरांनी दिलेले आश्वासन स्वागतार्ह आहे. भगतसिंग हे युवकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा पुतळा पुन्हा डौलाने उभा राहिला पाहिजे, हीच आमची मागणी आहे.” शिष्टमंडळाने महापौरांचे आभार मानून, लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg