पनवेल : पनवेल गावदेवीपाडा येथील 4.22 गुंठे जमिनीचे सातबार्यावर नावाची नोंद मंजूर करण्याकरिता पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी फिर्यादीकडे 50 हजाराची लाच मागितली होती. त्यातील 30 हजार रुपयाची लाच स्वीकारताना अलिबाग रायगड लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. फिर्यादी यांच्याकडे पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी त्यांचे काम करण्याकरिता स्वतःकरिता 20 हजार रुपये तसेच थंब अॅप्रुव्ह करून घेणार्या कर्मचार्यांसाठी 10 हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपयाची मागणी केली होती.
सदर रक्कम पंचमुखी हनुमान शेजारी मिठास स्वीटस् समोर स्वीकारत असताना सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्रचे शिवराज पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्रचे भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड अलिबाग पोलीस उपअधिक्षक सरिता भोसले यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून गोवर्धन माने यांना रोख रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.
























































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.