loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय कामात अडथळा प्रकरणी तारकर्ली सरपंच निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) - मालवण येथील सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता नितीन दाणे यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणातून मालवण तालुक्यातील तारकर्ली-काळेथर सरपंच स्नेहा केरकर यांची अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. देवबाग तारकर्ली रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि अन्य मागण्यांसाठी २१ मार्च २०२२ रोजी संशयित आरोपी सरपंच स्नेहा केरकर या सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणच्या कार्यालयासमोर चौथ्यावेळी उपोषणास बसल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२२ मार्च २०२२ रोजी दुपारी त्यांची तब्येत बिघडली. मात्र, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही. सहाय्यक अभियंता अजित पाटील हे कार्यालयात आले नाहीत. तक्रारी रस्त्याने कनिष्ठ अभियंता नितीन दाणे हे त्यावेळी त्या रस्त्याचे ठेकेदार आशिष परब यांच्यासोबत बिल करत होते. त्याचवेळी संशयित आरोपी स्नेहा केरकर यांनी बिले कसली करता, माझी तब्येत बिघडली आहे, माझ्यावर उपचार करायला सांगा, असे त्वेषाने बोलल्या. त्यांनी दाणे यांच्या कॉलरला हात घालून मारहाण केली. तसेच टेबलवरील फायली, मोबाईल फेकून दिले.

टाईम्स स्पेशल

यावेळी ऑफिसमधील महिला कर्मचारी पल्लवी मनसुख, चैत्राली गोसावी यांनी तीला बाजूला केले. याबाबत नितीन दाणे यांनी मालवण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार भादंवि कलम ३५३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान, सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीसोबत मालवण पोलिसांनी संध्या तुळसकर या होमगार्डला संरक्षणासाठी नियुक्त केले होते. त्यांचीही साक्ष झाली. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, फिर्यादीस झालेला विलंब महत्वपुर्ण व तटस्थ साक्षीदार न तपासणे आदी कारणास्तव आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg