loader
Breaking News
Breaking News
Foto

देशव्यापी औषध दुकाने बंद आंदोलनामध्ये साटेली भेडशी येथील औषध विक्रेत्यांचा सहभाग

दोडामार्ग (प्रतिनिधी) - देशभरातील औषध विक्री दुकाने व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्या तसेच सरकारच्या काही धोरणा विरोधात मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी मध्यरात्री असा २४ तास बंद पुकारला आहे. याला पाठिंबा देण्यासाठी मेडिकल असोसिएशनच्या आव्हानाला प्रतिसाद देत दोडामार्ग साटेली भेडशी येथील औषध दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला तर जिल्हा मुख्यालय येथे आयोजित आंदोलनामध्ये काही जण सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

औषध दुकाने बंद असल्याने काही रूग्णांची गैरसोय झाली तरी सरकारी रुग्णालयात जाऊन काही जणांनी औषध गोळया घेतल्या. औषध विक्री करणारे विक्रेते यांनी आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी देशव्यापी एक दिवस मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साटेली भेडशी येथील तीन मेडिकल, दोडामार्ग शहरातील सहा मेडिकल स्टोअर्स बुधवारी बंद ठेवून संबंधित औषध दुकान धारकांनी पांठीबा दिला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg