loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर बंद पडलेला सीएनजीचा पुरवठा पुन्हा सुरू

​रत्नागिरी: प्रशासनाचा आक्रमक इंगा दाखवताच अखेर रत्नागिरी शहरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून बंद असलेला जे.के. फाईल येथील मुख्य सीएनजी पंप जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या कडक निर्देशानंतर मंगळवारी १९ मे रोजी सकाळी ११ वाजता पूर्ववत सुरू झाला. "पंप त्वरित सुरू करा, अन्यथा थेट कायदेशीर कारवाई करू," असा कडक आणि थेट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक आशिष प्रसाद यांना दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक पावलामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली आणि अखेर बंद पडलेला सीएनजीचा पुरवठा पुन्हा सुरू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​काही दिवसांपूर्वी या पंपावर काही अज्ञात व्यक्तींनी येऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना विनाकारण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. या गुंडगिरीमुळे भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने काम सोडले. परिणामी, पंपाचे कामकाज पूर्णपणे कोलमडले. पंपाचे मॅनेजर रोशन भोईर यांनी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी आणि सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी १२ मे २०२६ पासून हा पंप तात्पुरता बंद ठेवत असल्याचे प्रशासनाला कळवले होते. ​या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून या पंपाला २४ तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने सुरक्षेची पूर्ण हमी देऊनही, तसेच पंप बंद होऊन ६ दिवस उलटूनही कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती करून पंप सुरू केला नव्हता.

टाइम्स स्पेशल

​सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने वाहनचालकांचा सीएनजीकडे ओढा वाढला आहे. त्यातच जे.के. फाईल येथील पंप शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने तिथे मोठी गर्दी होते. अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांनाही सीएनजीची तीव्र गरज होती. ही कोंडी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. आता पोलीस प्रशासनानेही या पंपावर २४ तास दोन पोलीस कर्मचारी तैनात केले असून, सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे सर्वसामान्य वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg