loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली येथील मधुकर कुडव यांचे उपोषण अखेर जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे

सावंतवाडी (प्रतिनिधी) - इन्सुली कुडवटेंब मुख्य रस्ता ते इसवटी मार्ग या रस्त्यावर अतिक्रमण होऊन रस्ता बंद होण्याच्या तक्रारीबाबत इन्सुली येथील मधुकर कुडव यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. यासंदर्भात इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी दखल घेऊन सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याशी चर्चा करत अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग रवींद्र खेबुडकर यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क साधला असून यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगितले. त्यानुसार गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या लेखी पत्रानुसार ग्रामपंचायत इन्सुली यांना भूमी अभिलेख विभागामार्फत सदर रस्त्याची शासकीय मोजणी करून त्या ठिकाणी हद्द निश्चित करुन जर रस्त्यावर मोजणी दरम्यान अतिक्रमण निश्चित झाले तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ अन्वये पुढील कारवाई करण्यास येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर मधुकर कुडव यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते लिंबू पाणी घेत आपले उपोषण मागे घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविस्तार अधिकारी अंकुश जंगले, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर, महेश सावंत तसेच आरोंदा जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठाणकर आदींनी उपोषणस्थळी भेट दिली व चर्चा केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg