loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपासह परिसरात महावितरणची भीषण समस्या

साखरपा (भरत माने) - साखरपा गावात गेल्या काही दिवसांपासून विजेची भीषण समस्या निर्माण झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती कामे, पाणीपुरवठा, व्यवसाय यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात विजेअभावी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प होत असून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक नागरिकांनी संबंधित वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याचे सांगितले. साखरपा परिसरातील वीज यंत्रणा तातडीने दुरुस्त करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, अन्यथा भावनांचा उद्रेक होऊ शकतो. महावितरण कर्मचाऱ्यांना मागील अनेक दिवस भांबेड 33 केव्ही लाइनचा फॉल्ट मिळत नसल्याने वारंवार ती लाईट जात आहे. तर देवरुख मेन लाईनचे काम पूर्ण न झाल्याने 11 केव्ही विद्युत पुरवठा देण्यात येतो, त्यावर मात्र पंप, फ्रिज, पिठाची दुकाने आदी कमर्शियल व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

मागील अनेक वर्षापासून पाली लाईंनची असलेली मागणी काहीच ठिकाणी बाकी आहे. मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे सुरू करण्यास विलंब होत आहे. ती जर सुरू झाली तर साखरप्याचा प्रश्न कायमचा संपू शकतो. लोकप्रिय व कार्यतत्पर आमदार किरण (भैया) यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असून त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg