loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर मतदारसंघातील शिवसेनेची चिपळूण तालुका कार्यकारिणी जाहीर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गुहागर मतदारसंघातील चिपळूण तालुक्याची नवीन कार्यकारणी आज पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी जाहीर केले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते येथील शिवसेना संपर्क कार्यालयात नियुक्तीचे पत्र देण्यात आले. गुहागर विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्याच्या तालुका प्रमुखपदी सुभाष जाधव यांची काही दिवसांपूर्वीच आमदार भास्करराव जाधव यांच्या शिफारशीने नियुक्ती झाली. त्यानंतर ही नवी कार्यकारणी करण्यात आली. त्यामध्ये उपतालुकाप्रमुखपदी संदीप चव्हाण आणि लक्ष्मण कोकमकर यांची तर सचिव म्हणून संतोष गोंधळेकर व उपसचिवपदी नंदकुमार कदम यांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यकारिणीमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली. यामध्ये संदीप घाग (उमरोली गट), नितीन निकम (कळवंडे गट), रमेश कुंभार (सावर्डे गट), राम डिगे (कापसाळ गट) आणि दीपक शिर्के (वहाळ गट) यांचा समावेश असून उपविभाग प्रमुख म्हणून संतोष हळदणकर (गुढे गण), मंगेश गुढेकर (उमरोली गण), नंदकुमार चव्हाण (भोम गण), फैयाज शिरळकर (कळवंडे गण), रघुनाथ चाळके (निवळी गण), अरविंद मेस्त्री, भिकाजी भुवड (वहाळ गण), सुशील चव्हाण (कोकरे गण ), रवींद्र कदम, कमलाकर आंब्रे (कापसाळ गण) यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय श्रीमती सुशीला पवार यांची चिपळूण तालुका महिला आघाडीच्या कळवंडे जिल्हा परिषद गटप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नूतन कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रधान केल्यानंतर आमदार भास्करराव जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी मार्गदर्शन करताना आपापल्या भागात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करून त्यासाठीचा कानमंत्र देखील सर्वांना दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg