देवळे (प्रकाश चाळके) - कोकणातील नारळाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक मजबूत स्थान मिळावे आणि स्थानिक नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठेच्या स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी “क्रांती व्यापारी” संस्थेच्या वतीने कोकण कृषी विद्यापीठ, कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड तसेच नारळ संशोधन केंद्राकडे विशेष मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडू राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी “सेमी-हस्किंग / चार बाजू सोलणी” ही आधुनिक नारळ सोलणी पद्धत कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे शिकवण्यात यावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी केली आहे.
सध्या कोकणात पारंपरिक “सापसोल” पद्धतीने नारळ सोलले जात असल्यामुळे नारळातील पाणी लवकर आटणे, वाहतुकीदरम्यान नारळ तडकणे, टिकाऊपणा कमी होणे तसेच मार्केटमध्ये आकर्षक सादरीकरणाचा अभाव अशा समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याउलट तामिळनाडूतील “चार बाजू शिल्लक ठेवून सोलणी” पद्धतीमुळे नारळ अधिक काळ टिकतो, पाणी टिकून राहते, वाहतुकीदरम्यान तडे कमी जातात तसेच नारळाला आकर्षक व एक्स्पोर्ट क्वालिटी स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत या प्रकारच्या नारळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील नारळाची गुणवत्ता उत्कृष्ट असूनही आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या अभावामुळे कोकणातील उत्पादक मागे पडत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठ, कोकोनट बोर्ड तसेच नारळ संशोधन केंद्र यांनी संयुक्तपणे कोकणात प्रशिक्षण शिबिरे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक स्थानिक समन्वय, शेतकरी सहभाग तसेच पहिले प्रशिक्षण आयोजन करण्यासाठी “क्रांती व्यापारी” संस्था पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी सांगितले.
























































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.